ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अरुणकाका जगताप भाजपात जाणार ?

अहमदनगर

अहमदनगर शहराचं राजकारण पाहिलं तर अलीकडील काळात शहरातील राजकारणात जगताप व कर्डीले कुटुंबियांचे वर्चस्व वाढले आहे. मार्केट समिती असो किंवा एडीसीसी बँक असो, मनपा असो की साधी ग्रामपंचायत यांचे राजकीय वर्चस्व ठरलेले आहे.

याचे कारण म्हणजे त्यांचे लोकाभिमुख राजकारण, तरुणांना एकत्र जोडण्याची कला. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात भूकंप येणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्याचे कारण असे की अरुण काका जगताप व आ. संग्राम जगताप राष्ट्रवादीत जाणार ही चर्चा.

जगताप कुटुंब पवार घराण्याशी जोडलेलं. काकांना शरद पवारांनी दोनदा विधान परिषदेवर आमदार केलं. तर संग्राम जगताप हे अजित पवार यांचे अगदी निकटवर्तीय. त्यामुळे नगर मध्ये राष्ट्रवादी व जगताप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं समजलं जात.

परंतु अलीकडील काही महिन्यात भाजपचे खा. सुजय विखे यांच्याशी संग्राम जगताप यांचे सूर चांगलेच जुळले आहेत. जेथे विखे तेथे जगताप दिसतातच.

आता नुकतंच आयुर्वेद कॉलेजवर शब्दगंध साहित्य संमेलन पार पडलं. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी खा. सुजय विखेंनी खुलेआम जगताप पिता पुत्रांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. ते म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवाजी कर्डिले बदलले. आता ते भाजपच्या संपर्कात आल्याने आमदार संग्राम जगताप यांचा साहित्याकडे कल वाढला आहे.

त्या मुळे काका, आता तुम्हीही कर्डिलांप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करा असे निमंत्रणच दिले. आमदार संग्राम जगताप यांनी मात्र खासदार विखे यांच्या अनुपस्थितीत हे निमंत्रण अप्रत्यक्षपणे नाकारले तो भाग वेगळा.मध्यंतरीच्या काळात कर्डीले व विखे यांत राजकीय तणाव निर्माण झाला होता.

परंतु मध्यंतरीच्या काळात दोघांनीही एकदम ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ची भूमिका घेतली. आता ते एकमेकांना सोडून कार्यक्रम देखील घेत नाहीत. त्यामुळे आता विखें सोबतच कर्डीले देखील त्यांना फोर्स करणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे