
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत राज्य बोर्डाच्या अध्यक्षांकडून महत्वाची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. आता आपण अध्यक्षांनी नेमके काय म्हटले आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे.
दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून एक नवीन अपडेट हाती आली आहे. तसेच दहावी आणि बारावीचा निकाल नेमका कधी लागणार ? याची संभाव्य तारीख सुद्धा त्यांनी जाहीर केली आहे.
काय आहेत डिटेल्स?
खरे तर सध्या विद्यार्थी आणि पालक दहावी आणि बारावीच्या निकालाची अगदीच आतुरतेने वाट पाहत असून त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण निकालाची तारीख आता जवळ येऊ लागली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल लागला होता आणि यंदाही मे महिन्यातच दहावी व बारावीचा निकाल लागणार आहे. आधी बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल अशी माहिती समोर येत आहे.
राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती देताना असे सांगितले की दहावी आणि बारावीचा निकाल 15 मे पर्यंत लागू शकतो. म्हणजे यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल वेळेच्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच बोर्डाकडून निकालासाठी देखील युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.
असे असतानाच आता 15 मे पर्यंत दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊ शकतात अशी माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षांकडून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तर निकाल कसा लागणार म्हणून विद्यार्थी थोडे चिंतेत सुद्धा आहेत.
पण निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सुकता सुद्धा आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून पेपर चांगले गेले असल्याने निकालही चांगला लागेल असे सांगितले जात आहे.
यंदा निकाल वेळेआधीच
वास्तविक दहावी आणि बारावी निकालाचा गेल्या वर्षी पूर्वीचा इतिहास पाहिला असता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागत असतो. 23 मे ते 31 मे दरम्यान बारावीचा निकाल जाहीर केला जातो आणि त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागत असतो.
गेल्या वर्षी मात्र दहावीचा आणि बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आला होता. गत वर्षी 21 मे ला बारावीचा आणि 27 मे 2024 ला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा तर गेल्या वर्षी पेक्षाही लवकर निकाल लागू शकतो. यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल 15 मे पर्यंतच जाहीर होण्याची शक्यता आहे.