ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांची निवड

अहमदनगर

ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांची अहमदनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला.या पदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली झालेल्या परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेनंतर त्यांची निवड करण्यात आली.

अॅड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी या विधि क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत.कायद्यातील पदवी बरोबरच त्यांनी लोकसंबंध, वैकल्पिक वाद निवारण, मानसशास्त्र या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांना येथील जिल्हा न्यायालय,कौटुंबिक न्यायालय आणि ग्राहक न्यायालयातील विधिज्ञ-अधिवक्ता म्हणून कामाचा दीर्घ अनुभव आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे