ब्रेकिंग
एकनाथ शिंदे यांची हत्या करण्याचा प्लॅन होता, आमदाराचा मोठा दावा…

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडले नसते तर चकमक घडवून त्यांची हत्या केली असती, असा गौप्यस्फोट संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.”