
जिल्हा पोलीस दलातील 615 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी तर 394 पोलीस हवालदार यांना सहा.पोलीस उपनिरीक्षकपदी (एएसआय) पदोन्नती दिली जाणार आहे. पदोन्नतीच्या कक्षेत येणार्या पोलिसांची यादी यापूर्वी प्रकाशित करण्यात आली होती.
त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, पदोन्नती देताना कोणत्याही पोलीस अंमलदारांवर अन्याय होऊ नये यासाठी बुधवारी (दि. 4) जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना मंडळाची बैठक झाली.
त्यानंतर पदोन्नती कक्षेत येणार्या पोलीस अंमलदारांची नव्याने यादी प्रकाशित करण्यात आली असून यावर 9 ऑक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. हरकती प्राप्त झाल्यानंतर आस्थापना मंडळाची बैठक घेतली जाणार असून त्यानंतर पोलीस नाईक व पोलीस हवालदार यांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लागणार आहे.