ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भाजपच्या मेहरबानीमुळे मुश्रीफांना पालकमंत्रीपद मिळाले हे त्यांनी विसरू नये

अहमदनगर

भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाले हे त्यांनी विसरू नये, भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील त्या त्या वेळी मी त्यांच्या समोर उभा राहील, असा इशाराच दिला.

हसन मुश्रीफ यांन पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील अवस्था सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही, अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्यावर दुसऱ्याच दिवशी थेट हल्लाबोल केल्याने समरजित घाटगे यांचा पवित्रा कायम असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

समरजित घाटगे म्हणाले की, भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळाले, हे त्यांनी विसरू नये. भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील, त्यावेळी मी त्यांच्यासमोर उभा राहणार आहे.

मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, पालकमंत्री तर सोडाच. त्यांच्याशी माझा संघर्ष कायम अटळ आहे. संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे