ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच

नांदेड

विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता.

या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ पर्यंत गेली आहे. या घटनेनंतरही रुग्णालय प्रशासन गाफिल असल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात ३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते १ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या दीड ते तीन दिवसाच्या नवजात बालकांचा समावेश आहे.

यासोबतच सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यात चार नवजात बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. सात रुग्णांच्या मृत्यूनंतर मागील ४८ तासात मृत्यूचा आकडा ३१ पर्यंत पोहचला आहे. त्यात १६ नवजात बालकांचा समावेश आहे.

नांदेडचे शासकीय रुग्णालय मराठवाड्यातील दुसरं मोठं रुग्णालय आहे. या रुग्णालयात नांदेड, परभणी, हिंगोली सह तेलंगणा राज्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. शेवटच्या क्षणी नातेवाईक रुग्णांना घेऊन येथे येत असतात. त्यांना वाववण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न असतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे