अहमदनगर जिल्ह्यातील खडकी खंडाळा येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न.
अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील खडकी खंडाळा या गावात दिनांक १ ऑक्टोबर रोजी माऊली उद्योग समूहाकडून महिला सक्षमीकरण व व्यवसाय कसा आणि काय करावा याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. आश्विनी गायकवाड यांनी केले होते. प्रमुख उपस्थिती माऊली उद्योग समूह चे संचालक कारंडे सर, जिल्हा उद्योग केंद्राच्या शुभदा थिगळे मॅडम, AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा या उपस्थित होत्या.
जिल्हा उद्योग केंद्रांच्या को ऑर्डिनेटर शुभदा थिगळे मॅडम यांनी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा म्हणजे शाळेतील बालवाडी आहे. असे वक्तव्य केले. व्यवसाय कसा निवडावा, काय काय व्यवसाय करता येतो, गव्हरमेंट कडून काय काय योजना आहेत, कसे लोन प्रोसेस करायची असते, काय कागदपत्रे लागतात, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत किती आणि कोणत्या वर्गाला सबसिडी दिली जाते. ही सर्व सविस्तर माहिती शुभदा मॅडम नी आलेल्या महिला आणि मुलींना दिली.
माऊली उद्योग समूह चे संचालक कारंडे सर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी, त्या पासून काय काय बनवले जातात, त्याची मार्केटिंग कशी करायची, आणि त्या प्रत्येक मशिन मागे किती पैसे कमवू शकता, त्या चे ट्रेनिंग कसे दिले जाते. हि सर्व सविस्तर माहिती महिलांना समजावून सांगितले.
शेवटी AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांनी मार्केटिंग कशी करायची, कसे स्वतः ला डिजिटल मिडिया मध्ये अपडेट करावे. ऑनलाईन बिझनेस कसा करावा ही सर्व माहिती सविस्तर सांगितले.
शेवटी सौ. आश्विनी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.