राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष बीड जिल्ह्याच्या एकल महिला समितीचे रेहाना पठाण मॅडम यांची माऊली उद्योग समूह आणि AR न्यूज च्या ऑफिसला धावती भेट.
अहमदनगर

अहमदनगर मधील वाडीया पार्क येथे माऊली उद्योग समूह आणि AR न्यूज चे ऑफिस आहे. दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष बीड व जिल्ह्याचे एकल महिला समितीचे सर्व कामकाज पाहणाऱ्या रेहाना पठाण मॅडम येऊन महिलांना व्यवसायाकडे वळण्यासाठी स्वतः च्या पाया वर कसे उभे राहावे या साठी मार्गदर्शन केले.
वास्तविक पाहता माऊली उद्योग समूह चे संचालक कारंडे सर हे घरगुती उद्योगावर भर देवून माल देणे आणि परत तोच माल विकत घेणे आणि त्या प्रोडक्ट्स ची मार्केटिंग करणे हि सुवर्ण संधी माऊली उद्योगाकडून जनतेला उपलब्ध करून दिली आहे.
त्या बरोबर कापूर, अगरबत्ती, समईवात फुलवात , सांजराणी धुप कप मशीन देणे, आणि त्या सोबत प्रशिक्षण व कच्चा माल ही देते.
येथे उपलब्ध मशिन्स १) कापूर मशीन मशीन २) धुप मशीन ३) अगरबत्ती मशीन ४) समई वात मशीन ५) फुलवात मशीन ६) पेपर प्लेट मशीन ७) पेपर कप मशीन ८) बिसलेरी मशीन ९) फुड रिलेटेड सर्व मशिन १०) कस्टमर रिक्वायड नुसार मशिन उपलब्ध करून देणे.
त्या सोबतच AR न्यूज मिडिया चे काम हे फक्त लोकल न्यूज कव्हर करत नाही तर अहमदनगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मीडिया चे काम करते.
तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. या मध्ये विविध प्रकारचे मुलाखती, विविध माहिती पुस्तिका, डिजिटल व्यवसायाचे फायदे महिलांना AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांनी खुप छान समजावून सांगितले. रेहाना पठाण मॅडम पुढे बोलताना म्हणाल्या की अहमदनगर मध्ये न्यूज चॅनल तर खुप आहेत.पण लेडीज साठी स्पेशल काम करणारे हे एकमेव चॅनल आहे.आणि चालवणार्या ही महिला पत्रकार आहे.
तसेच जिल्हा उद्योग केंद्रांच्या को ऑर्डिनेटर शुभदा थिगळे मॅडम या अगदी सविस्तर बिझनेस लोन प्रोसेस माहिती देऊन ते पास करून देतात. गव्हरमेंट च्या विविध योजना आहेत त्या लोकांना समजुन सांगतात.
अशा या एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे रेहाना पठाण मॅडम नी सांगितले.