ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

ए.बी. फॉर्मवर सही करेन पण उमेदवारी देणं आपल्या हातात नाही… बावनकुळे झाले हतबल

अहमदनगर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रायगड लोकसभा मतदार संघातील अलिबाग येथे संकल्प यात्रेसाठी आले होते. कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधत असताना रायगडच्या खासदारकीच्या जागेसाठी कार्यकर्त्यांनी धैर्यशील पाटील यांच्या नावाच्या घोषणा सुरू केल्या होत्या.

मात्र, आता महायुती झाली असून, अजित पवार गट देखील भाजपसोबत आले असल्याने युतीधर्म पाळावे लागणार आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव महायुतीकडून येण्याची शक्यता असल्याने बावनकुळे यांनी यावेळी सावध पावित्रा घेत युतीच्या जागा जिंकून आणायच्या असून, मी फक्त एबी फॉर्मवर सही करणार आहे.

उमेदवारीबाबत निर्णय आपल्या हातात नसल्याचे सांगून हात झटकले आणि कार्यकर्त्यांना भानावर आणले. यामुळे भाजप लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविणार नसून, महायुतीचा उमेदवार असेल हे नक्की झाल्याची भावना नेत्यांमध्ये झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे