ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सर्वांच्या सहकार्यातून प्रश्न मार्गी लागतात – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर - सकल माळी समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी समाजाला एकत्रित करीत पाठपुरावा सुरू केला आहे. सर्वांच्या सहकार्यातून प्रश्न मार्गी लागत असतात. यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा असतो.

सकल माळी समाजाचे विविध कार्यक्रम पार पडण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. तसा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित झाला असून त्यात ठरावाची कॉपी घेऊन राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. समाजाला मिळालेल्या जागेच्या माध्यमातून चांगले काम उभे करावे लागणार आहे. या माध्यमातून समाज एकत्रित येण्याचे काम होते.

सारसनगर परिसराला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण झाले असून महात्मा फुले चौक येथे लवकरच भव्य कमान उभारली जाणार आहे. समाजामध्ये चांगले काम करीत असताना विघ्नसंतोषी लोक खोडा घालण्याचे काम करतात त्याकडे आपण दुर्लक्ष करीत जनतेची कामे मार्गी लावत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सकल माळी समाजाला महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमासाठी दोन एकर जागेचा ठराव मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे