ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर शहरातील तीन दशकांपासून गुलाल विरहित गणेशोत्सवाची परंपरा

नगर शहरातील प्रेमदान हडको येथील महिलांच्या एकता प्रतिष्ठान ट्रस्टची परंपरा यंदाही कायम‎

एरवी विविध मंडळांच्या गणेशोत्सवावर पुरुषी वर्चस्व पाहायला मिळते, मात्र नगरच्या प्रेमदान हडको येथील एकता प्रतिष्ठान ट्रस्टच्या महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या गणेशोत्सवाला यंदा ३१ वर्षे पूर्ण झाले. ३० वर्षांपासून गुलाल विरहित गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा या ट्रस्टने कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे यंदा महिलांनी पुढाकार घेत या परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समवेत घेऊन विविध उपक्रम राबवले. या उपक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा व मुलांचा जो मोबाइल पाहण्यामध्ये वेळ जात होता तो वेळ या मुलांनी विविध खेळांच्या स्पर्धेत सहभाग घेऊन वाचवला आहे.

प्रेमदान हडको येथे १९९३ मध्ये महिला वर्गाने एकत्र येत गणेशोत्सव सुरू केला होता. एकता प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून महिलांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला यंदा ३१ वर्षे पूर्ण झाले आहेत. सामाजिक सलोख्याबरोबरच महिलांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर या गणेश मंडळाकडून उपक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या गणेशाची मूर्ती हे मंडळ स्थापन करते. कोकणातून कच्चा माल आणून गणेशाची मूर्ती हे मंडळ तयार करते. यंदा पेण येथील गणेशाची मूर्ती या मंडळाने तयार केली आहे. हरिपाठ, भजन, मंगळागौरचेही मंडळाने आयोजन केले होते. गेल्या ३० वर्षापासून गुलाल विरहित गणेशोत्सव साजरा करण्याची ही परंपरा या गणेश मंडळांनी आजही कायम ठेवली आहे.

ट्रस्टतर्फे एका कॉलवर गरजुला मिळते रक्त

रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे दहा वर्षांपूर्वी या प्रतिष्ठानने अष्टविनायक रक्तपेढीच्या माध्यमातून गरजवंतांना मोफत रक्त देण्याचा उपक्रम सुरू केला होता. रक्तपेढीकडे या प्रतिष्ठानच्या सदस्यांची यादी आहे. रक्तपेढीतून कॉल येताच ट्रस्टचे पदाधिकारी स्वतः जाऊन रक्तदान करतात. आजही एका कॉलवर रक्तदान देण्यासाठी पुढाकार घेणारे हे प्रतिष्ठान आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे पदाधिकारी सागर दुस्सल यांनी दिली.

मोबाइलवर मुलांचे जाणारे सहा ते सात तास वाचले

अतिरिक्त मोबाइल वापराचे दुष्परिणाम काही प्रमाणात सर्वच वर्गांवर होत आहे. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी बराच वेळ मोबाइलवर घालवतात. त्यांचा हा वेळ वाचावा या हेतूने ट्रस्टने परिसरातील सर्व मुलांना मैदानी खेळ व विविध स्पर्धांत सहभागी करून घेतले. या माध्यमातून त्यांचा दररोज मोबाइलमध्ये जाणारा सहा ते सात तासांचा वेळ वाचला आहे. पद्मावती जगताप, मंडळाच्या सदस्य.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे