मुंबई – मधुसूदन मसालाची बाजारात झणझणीत एंट्री.
पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार झाले मालामाल.

मसाले कंपनी मधुसूदन मसालाच्या शेअर्सने आज शेअर बाजारात यशस्वी प्रवेश केला. किरकोळ गुंतवणूकदारांकडून या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि एकूण सबस्क्रिप्शन ४४४ पट जास्त नोंदवले गेले.
आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा भाग ५९२ पेक्षा जास्त पट सबस्क्राइब झाला, तसेच या आयपीओ अंतर्गत ७० रुपयांच्या किंमतीत शेअर्स जारी करण्यात आले होते.
तर आज आज कंपनीच्या शेअर्सची एनएसई एसएमई (NSE SME) वर १२० रुपयांवर एंट्री झाली. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांना ७१.४३% लिस्टिंग नफा मिळाला. मात्र लिस्टिंग झाल्यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे शेअर्सची गती थोडी मंदावली.
मधुसूदन मसालाचा २३.८० कोटी रुपयांचा आयपीओ १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली होती आणि एकूणच हा आयपीओ ४४४.२७ पट भरला गेला असून यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) भाग ८६.९१ पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) भाग ५७४.०८ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा भाग ५९२.७३ पट भरला गेला.
या आयपीओ अंतर्गत १९ रुपये दर्शनी मूल्य असलेले ३४ लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले होते. या शेअर्सद्वारे उभारलेला पैसा खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.