ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र

सावेडी भागातील विघ्नहर्ता प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात नगरसेवकांनी केली आरती

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर सावेडी भागातील सामाजिक कामात अग्रेसर असणारे विघ्नहर्ता प्रतिष्ठान आहे. या वर्षी विघ्नहर्ता प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आरती साठी प्रभाग क्रमांक 2 चे विद्यमान नगरसेवक निखिल वारे विद्यमान नगरसेवक मा. बाळासाहेब पवार, विद्यमान नगरसेवक मा. विनीत पाऊलबुद्धे,विद्यमान नगरसेवक मा.सुनील त्र्यंबके उपस्थित होते.

सर्व उपस्थित नगरसेवकांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली व शहरातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त होऊदे अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.

विघ्नहर्ता प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे परवा पासुनच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून नागरिकांचा चांगला सहभाग या विविध स्पर्धेत दिसून येत आहे. संगित खुर्ची, चमचा लिंबू , तंबोला आदी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांनी सुरुवात झाली आहे.

महिलांसाठी खास खेळ पैठणी चा या कार्यक्रमाचे शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सुत्रसंचालक उध्दव काळापाहाड हे हा खेळ पैठणी चा कार्यक्रम सादर करणार आहेत.

या खेळात प्रथम बक्षीस पैठणी साडी, द्वितीय बक्षीस सोन्याची नथ, तृतीय बक्षीस चांदीचे नाणे आणि इतर भरपूर बक्षीस सहभागी महिलांना देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला परिसरातील सर्व महिलांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे अवहान प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.

तसेच आरती, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद यासाठी सावेडी परिसरातील सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन विघ्नहर्ता प्रतिष्ठान चे संस्थापक – श्री. प्रशांत दरेकर व मार्गदर्शक श्री. निलेश दाणे यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे