ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी 42 लाख रुपये रोख

मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाच्या चरणी गणेश प्रतिष्ठापनेच्या पहिल्याच दिवशी 42 लाख रुपये रोख व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दान आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

या गणपतीच्या दर्शनाला उत्सवातील दहाही दिवस देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यात सेलिब्रिटींची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. या बरोबरच राजकारणी मंडळींसह सर्वच क्षेत्रातील दिग्गज लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी हजेरी लावतात.

लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी 42 लाख रुपये रोख.

198.55 ग्रॅम सोन्याचे तर 5 किलो 449 ग्रॅम चांदीचे दागिने

बाप्पांसमोर पहिल्या दिवशी 42 लाख रुपये रोख, 198.55 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5 किलो 449 ग्रॅम चांदीचे दागिने दानाच्या स्वरूपात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

20 लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे