ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तिहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला

अहमदनगर

शिर्डीत एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. शिर्डीच्या सावळी विहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे.

हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने शिर्डी हादरले आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात हे हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

शिर्डीच्या सावळी विहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. रागाच्या भरात आरोपी सुरेश निकमने घरात घुसून वार केले. त्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू जागीच ठार झाल्या. यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाली. जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पत्नीचे नाव वर्षा सुरेश निकम (वय २४ वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (२५ वर्षे) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (७० वर्षे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे