श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथे पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळा उत्साहात पार पडली.
अहमदनगर प्रतिनिधी

शनिवार दिनांक १६/०९/२०२३ रोजी श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथे पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळेचे आयोजन केले गेले होते.
विद्यालयाचे ज्येष्ठ कला अध्यापक नंदकुमार यन्नम यांनी पर्यावरण पूरक (शाडू माती) गणपती कसा बनवायचा, त्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले, व पर्यावरण पूरक गणपतीचे महत्त्व विशद केले. त्यानंतर मुलांनी सुंदर असे गणपती बनवले. विद्यालयातील महिला अध्यापक यांनाही गणपती बनवण्याचा मोह आवरता आला नाही, त्यांनीही सुंदर सुबक गणपती बनवले.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यावेळी आवर्जुन उपस्थित होते. पर्यावरण पूरक गणपती का बनवले पाहिजे, त्याचे महत्त्व विशद करत शाडू माती गणपती बनवल्याने दहा दिवस त्याची मनोभावे पूजा केल्यानंतर विसर्जन करताना शाडू माती पाण्यात तात्काळ विरघळते, ही माती आपण आपल्या तुळस कुंडीमध्ये, किंवा झाडांमध्ये टाकून प्रदूषण मुक्त गणपती उत्सव आपण साजरा शकतो, असे इ.१ली ते १०वी विद्यार्थ्यांना त्यांनी विशद केले.
पर्यवेक्षक प्रमोद चन्ना यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या उपक्रमासाठी शाडू माती आणून पूर्व तयारी करणार्या निलेश आनंदास, मधुराताई आढाव, अजय न्यालपेल्ली तसेच पर्यावरण पूरक गणपती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचेही कौतुक केले.