ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अगदी शाडूसारखीच दिसणाऱ्या फायर क्लेच्या विक्रीतून होते सर्रास फसवणूक

नाशिक

  • तुम्ही मागता शाडू माती, विक्रेता देताे फायर क्ले..
  • विसर्जनावेळी मूर्ती अनेकदा पाण्यावर तरंगते आणि मग लक्षात येतो मातीतील फरक.

पर्यावरणपूरकतेचा प्रचार आणि प्रसार चांगलाच हाेत असल्याने आता बहुतेक घरांमध्ये शाडूचा आणि ताेही घरी तयार केलेला गणपती बाप्पा विराजमान केला जाताे. विसर्जनावेळी मात्र ही मूर्ती पाण्यावरच तरंगते आणि मग लक्षात येते की, ती माती शाडू नव्हतीच. शाडूसारखीच दिसणारी ती माती असते फायर क्ले. जी अजिबातच पर्यावरणपूरक नसते. मात्र सध्या शाडू समजून फायर क्लेचीच माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे.

बाजारात शाडू माती साधारणत: २० रुपये किलाे दराने मिळते. तर ३० किलाेची गाेणी ३५० रुपयांपर्यंत मिळते. तेच फायर क्लेची एक गाेणी २०० ते २५० रुपयांना मिळते. दिसायला दाेन्ही माती सारख्याच असल्याने खरेदीदारांना त्यातील फरक ओळखता येत नाही आणि विक्रेत्यांनाही ही माती घाऊक प्रमाणात खरेदी करायला परवडत असल्याने ते फायर क्ले खरेदी करतात.

राजस्थानातील वाळवंट, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही परिसरातील सत्त्व नसलेली माती, मातीच्या खाणीतील माती तसेच माेठ्या कारखान्यांमधील धातूमिश्रित राख त्यात पांढरे ठिसूळ दगड फाेडून तयार केलेली भुकटी असा हा फायर क्ले तयार केला जाताे. जाे शाडू म्हणून विकला जात असल्याचे मूर्तीकार मयूर माेरे यांनी सांगितले. तसेच यामध्ये लेड आणि अार्सेनिक, अॅल्युमिनियम, सिलिका असते. म्हणजेच त्यात रसायन असल्याने ते पर्यावरणपूरक कधीच नसते, असेही मयूर यांनी सांगितले.

फायर क्ले पर्यावरणपूरक नसते

माेठमाेठे स्कल्पचर तयार करताना यात काही प्रमाणात इतर प्रकारच्या मातीसोबत फायर क्लेचा वापर केला जातो. कारण, कारण या क्लेला थाेडी चमक असते. त्यामुळे यापासून तयार होणाऱ्या मूर्ती असोत किंवा अन्य कलाकारी, ती अधिक आकर्षक दिसते. या क्लेमध्ये लेड आणि अार्सेनिकचे प्रमाण आहे त्यामुळे याच्या वापरामुळे फंगल, स्कीन डिसीज हाेण्याची भीतीही असते. यापासून समजा बाप्पा बनवला तर ताे पाण्यावर तरंगताे. शाडू माती ही थाेडी रेडीश ग्रे असते. शाडू पाण्यात तत्काळ विरघळते. कृत्रिमपणाची त्यासाठी गरज नसते. – मयूर माेरे, मूर्तिकार.

फरक ओळखून खरेदी करावी
फायर क्ले असा अथवा शाडू माती, नवीन माणसाला या दोन्ही सारख्याच दिसतात. त्यामुळे सहजपणे ओळखू येत नाहीत. किमतीच्या तुलनेत फायर क्ले थाेडी स्वस्त असते. रवाळ असते, किंचित तेलकट असते. वजनालाही हलकी असते. काेरड्या हातात ही माती घेतली आणि टाकली की त्याचा तेलकट रंग बराच वेळ हाताला लागून राहताे. खरे तर शाडू मातीदेखील पर्यावरणपूरक नसते. त्या गणपतीचे विसर्जन घरच्या घरी करून तिसऱ्या दिवशी पाणी ओतून माती वाळू द्यावी. पुढच्या वर्षी परत वापरता येते. शाडू माती ही चिकट असल्यामुळे नदीतील पाण्याचे स्रोत बंद होण्याची शक्यता असते. – श्रेयस गर्गे, मूर्तिकार

असे ओळखता येते माती शाडू आहे की फायर क्ले

  • फायर क्ले भिजवल्यानंतर हाताला अधिक रवाळ लागते.
  • फायर क्लेची धूळ अधिक उडते.
  • शाडू पाण्यात लगेच भिजते, याउलट फायर क्ले पाणी टाकल्यावर उशिरा विरघळते, शिवाय नैसर्गिक मातीत ती मिसळत नाही.
  • फायर क्ले हातात घेतली तरी हाताला तेलकटपणा जाणवताे.
  • या मूर्ती ठिसूळ असल्याने मूर्तीला तडे जातात.

शाडू अशी आहे वैशिष्ट्यपूर्ण
शाडू माती पांढरट रंगाची असते. यात इतर मातीच्या तुलनेत सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असल्याने जुन्या काळात या शाडूचा वापर सण-उत्सवात मोठ्या प्रमाणावर केला जात होता. शिवाय शाडू भिजवल्यानंतर लगेच चांगली एकजीव होते. पाणी मिसळले की ती अधिक चिकटही होते. त्यामुळे या मातीला नंतर हवा तसा आकार देता येतो आणि यापासून निर्मित मूर्ती सुबक दिसतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे