
मोहन भागवतांचे विचार, आचार सर्वांना प्रेरणादायी महेंद्र गंधे – विधानसभा प्रमुख अ.नगर२२५ विधानसभा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासाठी केलेले कार्य खूप महान आहे. त्यांचे विचार, आचार सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली रा.स्व.संघाचे राष्ट्रप्रती समर्पित भावनेने होत असलेले कार्य हिमालय एवढे मोठे आहे.
मोहन भागवतांच्या कार्यास अनुरूप असा गो सेवेचा सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन शहर भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रभारी महेंद्रभैय्या गंधे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने पांजरपोळ गोरक्षण संस्थेतील गाईंना चारा देण्यात आला.
या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक प्रदीप परदेशी व सुमित बटूळे यांच्याही वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून अभीष्टचिंतन करण्यता आले.
यावेळी जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, व्यंकटेश बोमादंडी, दत्ता गाडळकर, अमोल निस्ताने, महावीर कांकरिया, पांडुरंग घोरपडे, विशाल खैरे, सुनील तावरे, ऋग्वेद गंधे, हुफेजा शेख, ओम काळे, विजय गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.