आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाच्या थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023 श्री.नरेंद्र खंडू राठोड यांना जाहीर
अकोला

महाराष्ट्र शासनाच्या थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाल्याबद्दल श्री.नरेंद्र खंडू राठोड यांनी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानले..
खरंतर हा सन्मान माझा नसून आपल्या सर्वांचा आहे.माझ्या एकूण 17 वर्षाच्या सेवेच्या अनुभवातील निष्पाप बाल गोपाळ विद्यार्थी, पालक व सहकारी शिक्षक बांधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ ग्राम पंचायत, खिरविरे, युवा तरुण मित्र मंडळ आणि प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी वर्ग, केंद्र, बीट, तालुका जिल्हा येथील सर्वच शिक्षक बांधव या सर्वांचा आहे.
मी केवळ एक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.म्हणुनच खरंतर हा सन्मान आपल्या सर्वांचा आहे.मी फक्त निमित्त मात्र आहे.सर्वांचे मनापासून आभार…