ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

समर्थ प्रिमिक्स घरगुती व्यवसाय करणार्या सौ.भारती वडेपल्ली यांच्या शी दिलखुलास गप्पा

अहमदनगर

सौ. भारती अंबादास वडेपल्ली.

राहणार विक्रोळी, मुंबई.

माझा व्यवसाय – समर्थ प्रिमिक्स

मोबाईल नं. – 90047 03200

माझे शिक्षण बी.काॅम झाले.माझा घरगुती च व्यवसाय आहे.‌ घरची जबाबदारी स्विकारता स्विकारता बाहेर पडून स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्याची संधी च मिळाली नाही. म्हणून मी स्वतः चा च व्यवसाय सुरू करायचा ठरवले.

मी मुंबईत असल्याने इतर वर्किंग मॉम, मुली, बायका यांची धावपळ धकाधकीचे जीवन बघत आले आहे. या सर्व जणींना साग्रसंगीत स्वयंपाक करायला वेळ च नसतो.‌ म्हणून ठरवले की रेडिमेड प्रिमिक्स तयार करून विकायचे.

मी गेले २ वर्षापासुन हा समर्थ प्रिमिक्स व्यवसाय करत आहे. माझ्या कडे सर्व प्रकारचे घरगुती पदार्थांपासून बनवलेले प्रिमिक्स मिळतात.

जसे की पाव भाजी, वडा पाव प्रिमिक्स, दाबेली , ढोकळा, इडली, गुलाब जाम ,केक, आईस्क्रीम, सरबत, कुल्फी, वाफले, पास्ता, न्युडल्स, चाॅकलेट, लाडू, तसेच सर्व प्रकारचे व्हेज, नाॅन व्हेज भाज्यांचे प्रिमिक्स मिळतात..

तसेच घरगुती वस्तूं पासून कॉसमेटिक्स प्रोडक्ट्स बनवते.

भारती ताई यांचे म्हणणे आहे की हा व्यवसाय करत असताना लोकांना घरगुती तयार करणारे प्रोडक्ट्स जास्त आवडतं नाही.‌तसेच त्यांचे म्हणणे की ते जास्त दिवस टिकत नाही. आणि कसे बनवतात काय माहीती.. म्हणून ब्रांडेड कंपनी चे प्रोडक्ट घेतात ते किती ही महाग असले तरी.. घरगुती लोकांवर अविश्वास दाखवला जातो..

या व्यवसायात खुप अडचण येत आहे म्हणजे मी राहते तो परिसर मुस्लिम परिसर असल्यामुळे माझ्या प्रिमिक्स ची जाहिरात किंवा विक्री होत नाही. आणि फायदा ही होत नाही. पण माझ्या मुंबई त इतर भागात राहाणार्या मैत्रीणींनी माझे प्रिमिक्स वापरून पाहिले त्यांच्या मार्फत मला छोट्या मोठ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. मला घरातुन‌ काहीच सपोर्ट मिळत नाही..

तसेच मुंबई मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कुकींग स्पर्धां मध्ये ही मी भाग घेते. माझी माऊथ टु माऊथ पब्लिसिटी होत आहे.

माझा छंद आहे की कुकींग, बेकींग, गाणे‌ ऐकणे हा‌ आहे.

माझे भविष्यातील प्लान आहे की माझ्या प्रिमिक्स ची सर्वत्र शाखा सुरू करण्यात येईल…

पुढील वाटचालीसाठी AR  न्यूज च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन-बोज्जा यांनी सौ. भारती ताई यांना मनापासून शुभेच्छा दिल्या..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे