ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढविणार?

पुणे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे पुण्यात सक्षम उमेदवार नसल्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव चर्चेत आणण्यात आले होते. आता मोदी पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमातून रंगली आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्यानेच अशी नावे पुढे येत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपकडून कोण उमेदवार असेल, याची चर्चा सातत्याने होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आठ महिन्यांचा कालावधी आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक झालेली नाही. स्थानिक पातळीवर माजी महापैर मुरलीधर मोहोळ, प्रा. मेधा कुलकर्णी यांची नावे चर्चेत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा करावा लागला होता. ही चर्चा थांबली असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे नाव शर्यतीमध्ये आले. त्याला दोन दिवस होत नाही तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्याबाबत पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केली आहे, असे सांगितले जात आहे. मोदी पुण्यातून लोकसभेवर निवडून आले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रुपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल, अशीही अटकळ बांधण्यात येत आहे.

तशा आशयाचे संदेश समाजमाध्यातून प्रसारित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढविणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, मात्र तूर्त भाजपकडे पुण्यात सक्षम उमेदवार नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे