ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तीन दिवस कार्यक्रम, क्रांती चाैकात लेझर शाे, निधी कमी पडू देणार नाही – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार

छत्रपती संभाजीनगर

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर “मराठवाड्याची लोकधारा’, क्रांती चौकात रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शहरात आढावा बैठक झाली. मुनगंटीवार म्हणाले, मुक्तिसंग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा, मराठवाड्याच्या मुक्तीसाठी महनीय व्यक्तींच्या योगदानाची माहिती द्यावी. सर्वांच्या सहभागाने हा सोहळा लोकोत्सव झाला पाहिजे. मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकासाठी १०० कोटींचा निधी दिला जाईल. त्यासाठी साडेचार एकर जागा दिली अाहे.

१६ सप्टेंबरला मॅरेथाॅन, कलेक्टर ऑफिस इमारतीचे भूमिपूजन

१६ सप्टेंबरला सकाळी ७.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल ते क्रांती चौक अशी पाच किमीची मिनी मॅरेथॉन स्पर्धा होईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा, सातारा व देवळाई मलनिस्सारण व हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई-लोकार्पण होणार आहे. दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळ बैठक हाेईल. रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत क्रांती चौकात सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो, आतषबाजी, ड्रोन शो असे कार्यक्रम होतील.

१५ सप्टेंबर : प्रभातफेरी काढून होणार सुरुवात

१५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता प्रभातफेरीने सांगता साेहळ्याची सुरुवात होणार आहे. यात शहरातील शालेय विद्यार्थी सहभागी होतील.

क्रांती चौक ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मार्गावर प्रभातफेरी काढण्यात येईल.

दुपारी १२ ते ४ या वेळात वंदे मातरम सभागृहात मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गाथा सांगणारी व्याख्याने होतील.

सायंकाळी ७ वाजता ‘मराठवाड्याची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे.

गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत समारोप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम कृतज्ञता रथयात्रेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आहे. स.भु. कॉलजेच्या मैदानावर १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सभा हाेईल, अशी माहिती रथयात्रेचे सहसंयोजक अॅड. संतोष केंद्रे यांनी दिली. मराठवाड्यातील गावांमधून एक कोटी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली माती रथातून शहरात अाणली जाईल. या मातीत वृक्षारोपण करण्यात येणार अाहे.

मंत्री, लाेकप्रति निधीं सह जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

बैठकीस मंत्री संदिपान भुमरे, अतुल सावे, अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे यांच्यासह प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मंथन बैठकीत विभागाच्या वाटचालीवर होणार चर्चा

१७ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी ८.४५ वाजता सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. त्यानंतर १० वाजता ‘मंथन’ बैठक हाेणार अाहे. त्यात विभागातील जिल्ह्यांची वाटचाल, प्रगतीबाबत चर्चा होणार आहे. संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे