जिल्हा न्यायाधीशांना बांधल्या राख्या,मुला- मुलींत भेदभाव करू नका, आजची नारी नाही बिचारी
अहमदनगर प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची जाणीव व्हावी, यासाठी स्थापन केलेल्या इंटरॅक्ट क्लब वतीने जिल्हा न्यायालयात न्यायाधीश व वकिलांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी केली.
‘मुला- मुलींमध्ये भेदभाव करू नका’ व ‘आजची नारी नाही बिचारी’,असा संदेश देणारे ‘नुक्कड’ हे पथनाट्य सदर करून उपस्थित न्यायिक अधिकारी व वकिलांचे मने जिंकली.
यावेळी जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश शुभांगी पाटील, रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षा मधुरा झावरे, सचिव अमोल खोले, उपक्रम प्रमुख मार्लिन एलिशा, नयना मुथा, टीना इंगळे, प्रियांका पारीख, मधूर बागायत, क्षितिज झावरे, हेमंत कारळे, वकील संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरकारी वकील अनिल सरोदे, विक्रम वाडेकर आदी उपस्थित होते.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले, महिला व मुलींना दुय्यम स्थान न देता पुरुषांप्रमाणेच एकसमान वागणूक मिळावी ही काळाची गरज आहे. नारिशक्तीमध्ये खूप ताकद आहे. पूर्वी आजीआजोबा लहान मुलींचे लाड करत असत. पण आता आईपेक्षा वडील मुलींचे लाड करत आहेत. सकारात्मक विचारांनी मुलामुलींचे एकसमान पालनपोषण करा. मार्लिन एलिशा म्हणाल्या, रोटरी क्लब मिडटाउन जसे सामाजिक काम करत आहे, तशी विद्यार्थ्यांनाही सामाजिक कामाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लब स्थापना केला आहे. शहरातील विविध भागांमध्ये हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी ससदर केले. या विद्यार्थ्यांनी तोफखाना पोलिस चौकीतील पोलीस कर्मचारी व माजी सैनिकांना राख्या बांधल्या.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे इव्हेंजेलीन मनशा, मनिष भोसले, अविनाश भोसले, अशोक सचदेव, मुख्याध्यापिका पूजा गुरबक्ष व अन्य शिक्षक उपस्थित होते.