
विजया दशमी निमित्त शस्त्रपूजन अहिल्या नगर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केशवनगर भागात विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव दादा चौधरी विद्यालयाचे प्रांगणात साजरा करण्यात आले.
तसेच नगर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पथसंचलन केले.दादा चौधरी येथून चौपाटी कारंजा, येथे म नपा नगरसेवक अजय चितळे व चौपाटी कारंजा मिञ मंडळ यांनी स्वागत करून फुलांचा वर्षाव केला .चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवी पेठ,माणिक चौक, बारा कोटी कारंजा,कौठीची तालीम, माळीवाडा चौक,पांचपीर चावडी, जुनी महापालिका,कोर्टगल्ली दादा चौधरी येथे समारोप करण्यात आला.अग्रभागी भगवा ध्वज,बँड पथक व शिस्तबद्ध संचलन होते.
समाजातील दुष्टशक्तींचा संहार करून विजय प्रस्थापित करणारा दिवस म्हणजेच “विजयादशमी” उत्सव. तसेच समाजातील अनेक क्रुरतेचा बीमोड करून आपल्या वैभवशाली परंपरांचे जतन करून मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हेच “सीमोल्लंघन”.
या उत्सवाचे वक्ते डॉ.कृष्णा देहाडराय (दक्षिण नगर जिल्हा, सेवा प्रमुख), प्रमुख पाहुणे अॅड.अभिजित अरविंद दळवी (लेखक, दिग्दर्शक),संघचालक वाल्मीक कुलकर्णी, जनकल्याण समितीचे डॉ.रवींद्र साताळकर,चिन्मय देशपांडे आदी प्रमुख उपस्थितीत होते.