ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नववर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे, गणवेश अन् ओळखपत्र सक्ती

अहमदनगर

नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत. गणवेश, ओळखपत्र बाळगणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाचा वापर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

1 जानेवारी 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी गणवेशात कार्यालयात येण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयास या संदर्भात सूचना केल्या आहेत.

गणवेशाचे बंधन प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारी असून ओळखपत्र मात्र दररोज सर्वांना दिसेल अशा पध्दतीने बाळगावे लागणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फिकट निळ्या रंगाचा सदरा आणि काळ्या रंगाची विजार तर, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फिकट पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचे ब्लाऊज अथवा पिवळ्या रंगाचे सलवार कमीज परिधान करावे, असे सूचित करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कार्यालयातील कर्मचारी आठवड्यात एक दिवस अशा पेहरावात दिसतील. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याच्या सूचना शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे