शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी पक्षातून बंड करत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या बंडाचं समर्थन केलं आहे.
तर काही आमदार आणि पदाधिकारी अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं.
राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानाने शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला. यावर उत्तर देताना, “सुप्रिया ताईंचे ते वडील आहेत आणि दुसरा भाऊ आहे. त्यामुळं सुप्रीया ताईंनाच जर माहिती नसेल ते एकत्र येणार आहेत की नाही? तर मला कसं माहिती असणार?” असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.