लकाकी फाउंडेशनच्या कुटुंब वृध्दाश्रमास इनरव्हिल अहमदनगर विनस ग्रुप तर्फे केली ५ बेडची मदत
अहमदनगर प्रतिनिधी

लकाकी फाउंडेशनच्या कुटुंब वृध्दाश्रमास इनरव्हिल अहमदनगर विनस ग्रुप तर्फे केली ५ बेडची मदत
मा. शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
लकाकी फाऊंडेशन संचलित सुरु केलेल्या कुटुंब वृध्द-आश्रमच्या उद्घाटन प्रसंगी वृध्दांसाठी झोपायला इनरव्हिल अहमदनगर विनस ग्रुप तर्फे पाच बेड ची मदत केली.
संस्थापक उमा बडगु व सारीका सिद्धम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत दिले.
इनरव्हिल अहमदनगर विनस ग्रुप च्या अध्यक्षा सौ. श्रीलता आडेप यांनी ५ बेड दिले. आणि या स्वत: समाजसेविका तसेच स्वतः एक संस्था चालवतात.
त्यामुळे त्यांनी एक आश्वासन दिले की या कुटुंब वृध्दाश्रम ला त्यांच्या गरजेनुसार जी काही मदत वस्तू स्वरूपात लागेल ती आम्ही पुर्ण करून देऊत तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..