ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आजपासून पुणे मार्गावर धावणार ई-बस. ५ बस झाल्या दाखल,आणखी १५ येणार

सोलापूर

सोलापूर बस स्थानकात गुरुवारी एक आणि शुक्रवारी रात्री चार अशा पाच शिवाई ई-बस दाखल झाल्या आहेत. पाचही ई- बस सोलापूर-पुणे मार्गावर धावणार असल्याची माहिती एसटी विभागाचे मुख्य विभाग नियंत्रक नितीन भालेराव यांनी दिली.

बसस्थानकात सकाळी साडेनऊला या बससेवेचा शुभारंभ होणार आहे.

सोलापुरातून पहिली बस पहाटे पाच वाजता सुटेल. त्यानंतर सकाळी सहा, सात, आठ, नऊ तर सायंकाळी चार, पाच‎आणि सायंकाळी सहा, सात, आठ वाजता गाड्या सुटतील.‎स्वारगेटहून पहाटे साडेपाच, साडेसहा, साडेसात, साठेआठ,‎साडेनऊ आणि दुपारी साडेतीन, साडेचार, साडेपाच,‎साडेसहा, साडेसात या वेळेत गाड्या सुटतील. तिकीट दर‎पूर्ण तिकीट ५४५, अर्धा तिकीट २८५ महिला, ज्येष्ठ नागरिक,‎लहान मुले यांच्यासाठी, ७५ वर्षांपुढील व्यक्तींना (अमृत‎योजना) पूर्णपणे मोफत आहे.‎

सकाळी शहरातून फेरी

शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ई बस गाड्या शहराच्या विविध भागांतून फेरी मारणार आहेत, अशी माहिती स्थानक प्रमुख विभाग प्रमुख विकास पोपळे यांनी दिली. सोलापूरसाठी वीस बस मंजूर झाल्या आहेत. पुढील टप्प्यात १५ बस येणार आहेत, असे सांगण्यात आले. सोलापूरसह अनेक स्थानकांवर चार्जिंग सुविधा तयार केली आहे. ई बसबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे