कर्जुने खारे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा पॅडचे वाटप
सक्षम पिढी घडविण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने उचललेले पाऊल दिशादर्शक -खासदार निलेश लंके

कृष्णाली फाउंडेशनचा सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड उपलब्ध करुन देण्याचा संकल्प
शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने कर्जुने खारे (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते परीक्षा पॅडचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी ॲड. राहुल झावरे, अशोक रोहकले, कृष्णाली फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमोल शिंदे, लोकहितवादी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अंकुश शेळके, सचिव प्रियंका पाटील शेळके, अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, श्रीकांत बोरुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास लांडे, कर्जुनेखारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन नरवडे, अलका येणारे, सुप्रिया देशमुख, वैशाली गुंडू, सविता नरोटे, मंदाकिनी शिंदे, सुमित दरंदले, देशमुख मॅडम आदी उपस्थित होते.
खासदार निलेश लंके विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिक्षणातून देशाची सक्षम पिढी घडणार आहे. सक्षम पिढी घडविण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने उचललेले पाऊल दिशादर्शक आहे. ही मुलं देशाची भावी पिढी असून, त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत पाटील शेळके यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांची मदत करण्याचा नेहमी प्रयत्न असेल, शैक्षणिक क्षेत्र तसेच आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच पर्यावरण यावर मोठ काम करण्याचा फाऊंडेशनचा उद्देश असल्याचे मत व्यक्त केले.
सध्याच्या काळात इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रमाण वाढले आहे. पण प्रत्येक पालक आपल्या मुलाचा प्रवेश इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये करू शकत नाही, म्हणून ते मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकतात. सर्वसामान्य कुटुंबातील मुले आजही जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत आणि आज मुलांमध्ये आपण एक चांगला उपक्रम राबवावा.
या उद्देशाने कृष्णाली फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून, या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये शैक्षणिक परीक्षा पॅडचे मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती प्रियंका पाटील शेळके यांनी दिली.