ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अनुसूचित जातीच्या तरूणांना उद्योजकतेचे मोफत प्रशिक्षण

सोलापूर प्रतिनिधी

वाढती बेरोजगारी पाहता सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीनी उद्योग व्यवसायकडे वळावे या दृष्टीकोनातून विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

२५ ऑगस्टपासून उद्योजकता व तांत्रिक प्रशिक्षण अंतर्गत टेलरिंग, फूड प्रोसेसिंग याविषयी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.

तांत्रिक विषयातील प्रात्यक्षिकासह उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, बाजारपेठ, व्यवस्थापन, विक्री कौशल्य, बँकेची भूमिका, शासनाच्या विविध कर्ज योजना व अनुदान विषयी सविस्तर माहिती तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र व विद्या वेतन मिळेल.

सदरील प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जासाठी आणि अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक, राम सुतार (९२२६१९६०५०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, किनारा हॉटेल समोर, होटगी रोड, सोलापूर यांनी केले आहे.

या संधीमुळे वाढत्या सुशिक्षित बेरोजगारीच्या काळामध्ये अनुसूचित जात प्रवर्गाच्या युवक-युवतींसाठी मोफत उद्योग प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्राने आयोजिलेल्या प्रशिक्षणाचा उपक्रम अनुसूचित जात प्रवर्गासाठी लाभदायी ठरेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे