श्री मार्कडेंय माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयामध्ये होत असलेली बेकायदेशीर भरती प्रक्रीया थांबवावी
अहिल्यानगर- शिक्षक उपसंचालक पुणे यांच्याकडे शरद क्यादर यांची निवेदनाद्वारें मागणी...

श्री मार्कडेंय माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय येथे ५ शिक्षण सेवक पदे रिक्त असुन त्याबाबत वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झालेली आहे.
वास्तविक पाहता सदरची जाहिरात ही सचिव विनायक गुडेवार यांनी प्रसिध्द केलेली आहे. सदर विनायक गुडेवार हे सदर पद्मशाली विदया प्रसारक मंडळाचे कधीही सचिव नव्हते व नाही.
त्याचप्रमाणे सदर विदयाप्रसारक मंडळावर कार्यरत असलेले बेकायदेशीर विश्वस्तांनी अनाधिकाराने वृत्तपत्रामध्ये बनावट स्वरुपाची खोटी माहिती असलेली जाहिरात प्रसारीत करुन इच्छुक शिक्षक सेवकांची दिशाभुल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करुन घेण्याकरीता सदरचे बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सदर बेकायदेशीर भरती प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक हे देखील सामील असुन त्यांचेशी संगनमत करून भरतीची बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
सदर विदयाप्रसारक मंडळाचा मी अध्यक्ष असुन सदर विदयाप्रसारक मंडळामध्ये अशा प्रकारे कोणतीही जाहिरात देण्याचा ठराव संमत झालेला नाही अथवा भरती प्रक्रियेला मान्यता मिळालेली नाही.
त्यामुळे वृत्तपत्रामध्ये प्रसारीत झालेल्या बातमी प्रमाणे कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया पद्मशाली विदयाप्रसारक मंडळामध्ये करण्यात येवु नये अथवा त्याला मान्यता देवु नये याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना आदेशीत करण्यात यावे अशी मागणी शिक्षक उपसंचालक पुणे यांच्याकडे शरद क्यादर यांची निवेदनाद्वारें केली..