ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता

टाकळी हाजी पुणे - पुणे नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना

वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना, मंगळवारी (दि. ८) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून, उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता. मात्र, तपास लागला नाही.

पद्माबाई शेषराव काकडे (रा.मोहगव्हाण ता.कारंजा, जि.वाशिम) ही ५५ वर्षीय महिला नातेवाइकांसोबत रांजण खळगे पाहत असताना, तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेली. मात्र, तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठमोठे खड्डे असल्याने, ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी, असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.

महिला पाण्यात पडल्याचे पाहताच, तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले. मात्र, नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.

सोबत असलेल्या नातेवाइकांनी आरडाओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून, त्यांचाही जीव थोडक्यात बचावला आहे, असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे