लायन्स प्रांत 3234 डी-2 च्याप्रांतीय मंडळात नगर मिडटाउन व मिलिनीयमच्या 6 लायन्स चा समावेश
अहमदनगर प्रतिनिधी

लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 डी -2च्या सन 2023-24 च्या लायनेस्टिक वर्षात अहमदनगर मिडटाऊन व मिलिनीयम लायन्सच्या जेष्ठ पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे.
लायन्स मिडटाऊनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांची प्रांताच्या साईड फर्स्ट च्या अध्यक्षपदी तर, संतोष माणकेश्वर यांची सहप्रांतीय सचिव, माजी अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांची ग्लोबल मेम्बर शिप उपाध्यक्षपदि निवड करण्यात आली आहे.
लायन्स मिलिनीयमचे माजी अध्यक्ष हरिष हरवाणी यांची नगर विभाग अध्यक्षपदी, ला.महेश पाटील यांची सहप्रांतीय सचिव, तर ला.मल्लेश नल्ला यांची पर्यावरणाच्या नगर विभागासाठी निवड करण्यात आली.
यातूनच प्रांतीय पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहन व शपथविधी पुणे येथील टीप- टॉप इंटरनॅशनल हॉटेल मध्ये संपन्न झाला. या प्रसंगी नूतन प्रांतपाल विजय भंडारी , माजी प्रांत पाल द्वारका जाधव ,ला. रमेश शहा , ला.दीपक शहा, ला.राजकुमार राठोड,ला डॉ. ज्योती तोष्णीवाल, ला. फत्तेचंद रांका , अरुण सेठ, डॉ. विक्रांत जाधव, डॉ. अनिल तोष्णीवाल, सी डी सेठ, प्रांतीय सचिव अशोक मिस्त्री, प्रांतीय कोषाध्यक्ष राजेंद्र गौयल प्रांताचे प्रशासक प्रमुख श्याम खंडेलवालसह नगर ,पुणे, नाशिक या तीन महसूल जिल्ह्यातील लायन्स चे पदाधिकारी उपस्थित होते.