ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा होणार कायापालट

मुंबई

देशभरातील १३०० व महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

यापैकी ५०८ रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यावर २४ हजार ४७० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २५ राज्यांत ५०८ स्थानके या माध्यमातून विकसित हाेतील.

रेल्वे बाेर्डाचे एक अधिकारी म्हणाले, आगामी ५० वर्षांची गरज लक्षात घेऊन या स्थानकांचा विकास केला जात आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आली आहेत. विकास कार्य अमृत भारत स्टेशन याेजने अंतर्गत केले जात आहे. १३०० स्थानकांपैकी काही साेडल्यास सामान्यपणे स्थानक रेल्वे रुळाच्या केवळ एका बाजूने असल्याचे दिसून आले आहे.

काही वर्षांत रेल्वे मात्र रेल्वे रुळाच्या दाेन्ही बाजूने शहर विकसित झाले आहे. त्यामुळे दाेन्ही बाजूने लाेक स्थानकावर येतात. त्यामुळेच दाेन्ही बाजूने स्थानक इमारतीला विकसित केले जाईल. अनेक शहरांत तर रेल्वेस्थानकाजवळच बसस्थानक, आॅटाे स्टेशन व मेट्राेही आहे.

त्यामुळे रेल्वेस्थानकाजवळच वाहतुकीच्या इतर पर्यायांची एकीकृत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसस्थानक किंवा आॅटाे टॅक्सी स्टँडशी रेल्वेस्थानकांना जाेडले जाण्याचे नियोजन केले आहे.

बांधकाम असे असेल 

जमीन कमी असलेल्या ठिकाणी रेल्वेस्थानकाची इमारत बहुमजली राहणार आहे. वरच्या मजल्यांवर प्लाझा विकसित केला जाईल. प्रतीक्षा कक्ष, रिटायरिंग रूम, भाेजन कक्ष, दुकाने इत्यादी व्यवस्था असेल. स्थानकाच्या दाेन्ही बाजूने प्रवेशद्वार असेल. विमानतळ असलेल्या शहरांत चेक इन सुविधा असेल.

अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, मलकापूर, शेगाव, बल्लारशहा, चांदा फोर्ट, चंद्रपूर, वडसा, गोंदिया, हिंगणघाट, पूलगाव, सेवाग्राम, वाशिम, चाळीसगाव, हिंगोली, जालना, परतूर, कोल्हापूर, लातूर, मुंबई परेल, कांजूर मार्ग, विक्रोळी, काटोल (नागपूर), गोधनी, नरखेड, अौरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), किनवट, मुखेड, मनमाड, नगरसोल, उस्मानाबाद (धाराशिव), गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, आकुर्डी, दौंड, तळेगाव, कुर्डूवाडी, पंढरपूर, सोलापूर. प्रकल्पावर २४ हजार ४७० काेटी रुपये खर्च अपेक्षित..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे