नारळी पौर्णिमा व महर्षी मार्कंडेय महामुनी भगवंतांचा भव्य पालखी व रथोत्सव
अहिल्यानगर- समस्त पद्मशाली समाज बंधू-भगिनींना भावपूर्ण आवाहन

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नारळी पौर्णिमा व महर्षी मार्कंडेय महामुनी भगवंतांचा भव्य पालखी व रथोत्सव आयोजित करण्यात आला आहे..
नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही…ही आपल्या श्रद्धेची, संस्कृतीची, परंपरेची आणि समाजाच्या एकजुटीची पवित्र पर्वणी आहे.
अहिल्यानगर शहरात पद्मशाली समाजाने काढलेल्या मूक मोर्चाच्या वेळी समाज बांधवांचा जो अलोट जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता, तो आपल्या समाजाच्या एकीची आणि ताकदीची साक्ष देणारा क्षण होता.आज पुन्हा एकदा तीच ज्वाला, तोच उत्साह आणि त्याहीपेक्षा दुप्पट जोशाने समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे..यावेळी त्या मूक मोर्चापेक्षाही मोठ्या संख्येने आपण पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे..
आपण आपल्या क्षेत्रात कितीही मोठे झालो… कितीही यश मिळवले… कितीही उंची गाठली…तरीही आपल्या समाजाला एकत्र आणणे, समाजाची एकी मजबूत करणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी उभे राहणे, यापेक्षा मोठे सामाजिक कार्य कोणतेही नाही.आपण पुढच्या पिढीला केवळ संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा देऊन जाणार नाही…तर आपल्या समाजाविषयी आपुलकी, अभिमान आणि बांधिलकीची भावना त्यांच्या मनात रुजवून जाणे, हीच आपली खरी जबाबदारी आहे.
आपली मुले जेव्हा आपल्या समाजाची हजारो माणसे खांद्याला खांदा लावून, एकदिलाने आणि भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी होताना पाहतील, तेव्हा त्यांच्या मनात एकच भावना निर्माण झाली पाहिजे.“हा माझा समाज आहे…त्याच्या सुख-दुःखात मी सदैव उभा राहणार..
या वेळी पालखी मार्गावर पाय ठेवायलाही जागा उरली नाही पाहिजे..जिथे नजर जाईल तिथे.. पद्मशाली समाजाची माणसेच माणसे दिसली पाहिजेत..महर्षी मार्कंडेय महामुनी भगवंतांच्या जयघोषाने अहिल्यानगरचा आसमंत दुमदुमला पाहिजे..आपल्या अंगातील रक्त सळसळले पाहिजे…छाती अभिमानाने फुगली पाहिजे…मनामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द जागी झाली पाहिजे..आणि प्रत्येकाच्या मनातून एकच आवाज आला पाहिजे..
“मी पद्मशाली आहे…माझा समाज माझी ओळख आहे…आणि माझ्या समाजाची एकी हीच माझी ताकद आहे..ही केवळ गर्दी नसावी…हा आपल्या एकीचा महासागर असावा.. ही केवळ पालखी नसावी… हा आपल्या सामाजिक सामर्थ्याचा जागर असावा.. ही केवळ उपस्थिती नसावी…हा पुढच्या पिढीसाठी एक जिवंत संस्कार असावा..
संपूर्ण कुटुंबासह सहभागी होऊया..महर्षी मार्कंडेय महामुनी भगवंतांच्या चरणी श्रद्धा अर्पण करूया.. समाजाच्या एकीचा जयघोष करूया…समाजासाठी एकत्र येण्याची जिद्द जागी होऊ द्या..
जय महर्षी मार्कंडेय महामुनी भगवंत..जय पद्मशाली समाज..
वार – शुक्रवार..
दिनांक – २८ ऑगस्ट २०२६..
दुपारी- २.०० वाजता..




