राजयोगीनी दादी प्रकाशमणीजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन
नांदेड

माऊंट अबू राजस्थान येथील प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशाशिका दिवंगत दादी प्रकाशमणीजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नांदेड येथील फरांदे पार्क येथील ‘सुखमणी ‘ सेवा केंद्र आणि डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान महाअभियान शिबीरात एकूण दहा भाऊ -बहिणींनी रक्तदान करून आपला सक्रिय सहभाग नोंदवला आणि देशातील गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करून मदतीचा, सहकार्याचा हात पुढे केला.

सकाळी ११ वाजता शिबीराचे उद्घाटन सुखमणी सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगीनी अनिता दीदी आणि डॉ.शं.च.वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील डॉ.धनश्री मुंडे, कुणाल महागडे, चक्रवर्ती चौदंते, गिरीश पुराणिक, दिपक वानखेडे, कु. माहीन नाज,कु. मयुरी, अक्षय करे आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. त्याच बरोबर शौल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्या नंतर एडवोकेट केदार जाधव, सचिन शंकरपुरे, प्रा.डाक्टर भगवान व्यास, रूपेश पाटील, सुलोचना पाटील डॉ.अनुजा पाटील, शिवलिला बहन, सोनाली बहन, रेणुका माता, सुरेखा जोगदंड, यांनी रक्तदान केले.
सायंकाळी स्नेह भोजनाचा (ब्रह्मा भोजनाचा) आस्वाद घेतला. राजयोगीनी अनिता दीदी यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. रोहिणी गोरे यांनी दादी प्रकाशमणीजी यांच्यावर केलेली कविता सादर केली या आनंददायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ कल्पना जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ राम जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ आनंद मनुरकर, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे, इंजिनिअर सुनील देशमुख, इंजिनिअर भगवान राव कदम, प्रोफेसर निळकंठराव जाधव, रूपेश भाई,सोहम भाई,सौ.चित्रा देशमुख, सुषमा अंकुलवार, योगिनी बहन,श्रीमती निर्मला टाक माता, श्रीमती सुनंदा गोरे, श्रीमती अंबुबाई बंगाळेमाता,नागरिक, महिला उपस्थित होत्या..




