ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

विसर्जन मिरवणुकीच्या पारितोषिकांत वाढ,मंडळांनी समाजप्रबोधनासह महाराष्ट्र संस्कृतीचे जतन करावे – महापौर ज्योतीताई गाडे

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजप्रबोधन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच विविध देखाव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे आणि मंडळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी महापौर ज्योतीताई गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धा समितीची बैठक संपन्न झाली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती दिपालीताई बारस्कर, उपसभापती वर्षाताई सानप, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, रोहन सानप, समिती सदस्य, ज्येष्ठ सिनेमा अभिनेते श्रेणिक शिंगवी, गड-किल्ले अभ्यासक अभिजीत दरेकर, आर्किटेक्ट व चित्रकार अजय अपूर्वा, प्रसिद्धी विभाग व सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजन, क्रीडा अधिकारी फिलिप्स, लेखा निरीक्षक गणेश लईचट्टी आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, यावर्षीपासून ऐतिहासिक देखावे या विषयामध्ये गड-किल्ल्यांच्या देखाव्याचा समावेश करण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा समाजासमोर येण्यास यामुळे मदत होईल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम करावे. विविध देखाव्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश आणि जनजागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गणेश विसर्जन मिरवणूक मराठमोळ्या पद्धतीने, आपल्या संस्कृतीचे जतन करणारी, समाजप्रबोधनपर, शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने काढणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

• प्रथम पारितोषिक : १५ हजारांवरून २५ हजार रुपये.

• द्वितीय पारितोषिक : १० हजारांवरून १५ हजार रुपये.

• तृतीय पारितोषिक : ७ हजारांवरून १० हजार रुपये.

अशी वाढ करण्यात आल्याची माहिती महापौर ज्योतीताई गाडे यांनी दिली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे