ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकार सुशील थोरात यांची खा. निलेश लंके यांनी घेतली भेट

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे ही गंभीर बाब आहे.

​काल त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन सुशील थोरात यांची आस्थेने विचारपूस केली, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली व त्यांना धीर दिला. या प्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडकडीत कारवाई करावी, अशा सूचना संबंधित पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. दबावाचा परिणाम… कारवाईला सुरुवात..

कालच पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते.आणि आजच पोलिसांनी या प्रकरणातील ४ आरोपींना अटक केली

पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेले 3 आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 20/08/2026 रोजी यातील फिर्यादी सुशिल मारूतराव थोरात, वय 49, धंदा पत्रकार, रा.राज्य कर्मचारी सोसायटी, समतानगर, सावेडी, अहिल्यानगर याचे मारूती अल्टो कारला इसम नामे सोनु कोहक याने त्याचेकडील मोपेड गाडीने धडक दिल्याचे कारणावरून, तसेच आरोपीचे विरोधी बातम्या लावण्याचे कारणावरून सोनु कोहक, पप्पु मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड व अनोळखी पहिलवान अशांनी फिर्यादी व त्यांचे मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच सोनु कोहक इतरांनी फिर्यादीस खाली पाडून, डोक्यात, पाठीवर दगडाने मारहाण केली व गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 717/2026 बीएनएस कलम 109(1), 118(1), 115(2),352, 351(3), 189(2), 191(2), 191 (3),190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर शहरातील पत्रकारास झालेल्या मारहाणीच्या घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती मिळताच मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/विकास जाधव, संदिप दरवडे व पोलीस अंमलदार संदिप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाहीद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनिल मालणकर, भगवान थोरात, प्रशात राठोड अशांचे दोन पथके तयार करून गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.

तपास पथक गुन्हयातील पाहिजे आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत,सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे राजगुरूनगर, पुणे शहर येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने राजगुरूनगर, पुणे शहरात आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी तेथून पसार झाले. दिनांक 24/08/2026 रोजी गुन्हयातील आरोपी नामे हेमंत उर्फ सोनु दत्तात्रय कोहक, रा.सनफार्मा शाळेसमोर, बोल्हेगाव,ता.अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह वाळुंज, पंढरपूरजवळ एमआयडीसी परिसर, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी असल्याची माहिती मिळाली.

पथकाने मिळालेल्या माहितीवरून गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा वाळुंज एमआयडीसी परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे आरोपीतांचा शोध घेऊन 1) हेमंत उर्फ सोनु दत्तात्रय कोहक, वय 27, रा.सनफार्मा शाळेसमोर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर 2) महेश उर्फ पप्पु दशरथ मते, वय 27, रा.नम्रता कॉलनी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर 3) प्रशांत शिवाजी निक्रड, वय 25, रा.तागडवस्ती, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्यांनी फिर्यादी सुशिल मारूतराव थोरात व त्याचे मुलास मारहाण केली असल्याची माहिती सांगीतली.

पथकाने ताब्यातील आरोपीतांना गुन्हयाचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले असून, गुन्हयाचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे