ब्रेकिंगमहाराष्ट्र
केडगाव दगडफेक प्रकरण – दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता
अहिल्यानगर

अहिल्यानगर, 26 मे 2026 केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व 600 आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचाही समावेश आहे.
एप्रिल 2018 मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता.




