ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’ लागू करण्यात आले आहेत.

या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरले जाणारे उपकलम आहे.

मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश साधारणत १५ दिवसांपर्यंत लागू राहू शकतो; पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते.सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का? असा प्रश्न विचारला जातो.

या आदेशानुसार नुसार शस्त्रे बाळगणे दगड, स्फोटके, लाठ्या इ. ठेवणे, भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणे,सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यांवर बंदी लागू करता येते. जर एखाद्या व्यक्तीने वरील बंदीचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर: पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.

पुणे शहरात होणाऱ्या बकरी ईद तसे च इतर सण-उत्सवाचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे