ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अभियंत्ये आक्रमक कामबंद आंदोलन सुरू

नगर जिल्ह्यात हजारो कोटी रुपये खर्च होऊनही जलजीवन योजना रेंगाळली आहे. याबाबत तक्रारीही सुरू आहेत. शासनाने याची गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर, आता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी 2024 मध्ये पहिली तक्रार केली. त्यांनी जिल्ह्यातील 112 योजनांच्या कामांत हलगर्जीपणा झाल्याची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यानंतर जलजीवन मिशन संचालकांनी दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी सात सदस्यांची समिती नेमून तपासणीच्या सूचना केल्या. या समितीने जिल्ह्यातील 630 पैकी 15 योजनांची तपासणी केली. यामध्ये हनुमान टाकळी, कारेगाव, कोळेवाडी, पत्र्याचा तांडा, हातगाव, मानोरी, तांदुळवाडी, करजगाव, पिंपळगाव फुणगी, गणेगाव, प्रतापपूर, सांगवी, उंबरगाव, निमगाव खैरी, गोगलगाव अशा काही योजनांच्या कामांची, खर्चाची तपासणी झाली.

त्यानुसार, सध्याचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांच्यासह तत्कालीन कार्यकारी अभियंता एस.एस. गडधे, उपअभियंता पी.बी. जायभाये, शाखा अभियंता डी.व्ही.परदेशी, उपअभियंता आर.पी.पिसे, उपअभियंता पी.आर.संवत्सरकर यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगानायक यांनी काढले आहेत.

जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांवर केलेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने व तथ्थहीन तक्रारीच्या आधारे आहे. त्यांना बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही. दोषी नसलेल्या किंवा तांत्रिक अडचणींमुळे काम रखडलेल्या अभियंत्यांवरील कारवाई मागे घ्यावी, तसेच काम करताना प्रशासकीय संरक्षण मिळावे, अशी मागणी एमजीपी तसेच झेडपी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एस. एस. आरळकर, अजिंक्य काटकर डी. डी पवार, पी.पी. पंडित, ए. बी. चव्हाण, आर. एस. आंबेकर, के. एस. केसापुरे, डी. पी. पाटील, आर. एस. थोरात, व्ही. एस. वांढेकर, जे. डी. बिबाल, एम. बी. गायकवाड, सु. दा. हरदास, डी. व्ही परदेशी आदींनी हे निवेदन दिले.

पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याचे आम्ही स्वागत करतो. लवकरच तत्कालीन सीईओ आशिष येरेकर यांच्यावरही कारवाई होईल, अशी खात्री आहे. तसेच पाणीपुरवठा मंत्र्यांच्या एका स्वीय सहायकाची चौकशी करावी. निलंबित करण्यात आलेल्या अभियंत्यांनी ही कारवाई अन्यायकारक आणि एकतर्फी असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असून, आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची बाजू ऐकून न घेता कारवाई करण्यात आली असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे