गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
जामिनावर सुटताच बेकायदेशीर रॅली, अहिल्यानगरमध्ये सराईत गुन्हेगार जेरबंद

अहिल्यानगर जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर बेकायदेशीररीत्या विनापरवाना रॅली काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या व सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले.
भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (वय १९, रा. बोल्हेगाव फाटा, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
आरोपी भोऱ्या हा खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्या मधील प्रमुख आरोपी असून, ४ जुलै २०२६ रोजी त्याची जिल्हा कारागृहातून न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. जेलमधून सुटताच आरोपी भोऱ्या आणि त्याच्या १० ते १५ साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवला.




