ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीमहाराष्ट्र

UPI चा गैरवापर करून सायबर चोरी, काही मिनिटांत अहिल्यानगरच्या तरुणाला 10 लाखांचा गंडा

अहिल्यानगर शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका अज्ञात भामट्याने तरुणाच्या बँक खात्यांवर डल्ला मारत तब्बल 10 लाख 2 हजार 779 रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुण श्रीराम संजय बांगर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम बांगर हे पाथड तालुक्यातील लोहसर येथील रहिवासी असून ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. गेल्या शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या तीन वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमधून पैसे काढून घेतले. यामध्ये आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यांचा समावेश आहे.

चोराने युपीआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटांत ही सर्व रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली. खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

श्रीराम बांगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे