ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर बाजार समिती व नेप्ती उपबाजार दोन दिवस बंद राहणार

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी निघालेला श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पायी दिंडी सोहळा अहिल्यानगरमध्ये येत असल्याने, कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य बाजार मार्केट यार्ड व नेप्ती उपबाजार दोन दिवस बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

हा पालखी सोहळा ११ जुलै व १२ जुलै या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी बाजार समितीच्या भुसार व भाजीपाला यार्डवर थांबणार आहे. या दिंडीमध्ये सुमारे ५० हजार वारकरी सहभागी असून, त्यांच्या जेवणाच्या व इतर नियोजनासाठी माथाडी कामगारांची आवश्यकता भासणार आहे.

याच पार्श्वभूमीवर १२ जुलै आणि १३ जुलै रोजी बाजार समितीचे नेप्ती उपबाजार दोन दिवसांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

१४ जुलै पासून नेप्ती उपबाजार पुन्हा नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी दिली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे