ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालक मंदिर महिला मंडळ शाळेत पालक सभा

अहिल्यानगर

बालक मंदिर महिला मंडळ शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी पालकसभेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ ज्योतीताई केसकर प्रमुख पाहुण्या सौ छायाताई राजपूत, सर्व पालक आणि सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सर्वांगीण विकासासाठी जलसाक्षरता ,पर्यावरण साक्षरता, अर्थसाक्षरता, व्यवहारज्ञान आणि मूल्य संवर्धन अशा सर्वच बाबींचे ज्ञान शालेय जीवनापासून दिलेच पाहिजे असे प्रास्ताविकातून बोलताना मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी सांगितले.

शाळेतील सर्व उपक्रम तसेच पालकांनी दिलेली साथ आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न या सर्व गोष्टी शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत असेही मत त्यांनी व्यक्त केले.सहशिक्षिका सौ. ठकुबाई पवार यांनी प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप व स्पर्धापरीक्षांबद्दल माहिती दिली.

सहशिक्षिका सौ सीमा कवाष्टे यांनी स्वच्छता व शाळेतील नियमांबाबत माहिती दिली. सहशिक्षिका सौ.सुकन्या बोल्ली यांनी अपडेट शालेय डॉक्युमेंटेशन संदर्भात माहिती दिली. शालेय शिस्त, मूल्य व जागरूकता यासाठी विद्यार्थी व पालकांनी काय करावे या संदर्भात सहशिक्षिका सौ वैशाली सातपुते यांनी प्रबोधन केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या सौ छायाताई राजपूत यांनी सर्व पालकांना एक मूल एक झाड असा संदेश देऊन पालकत्वाचे पालन करण्यास सांगितले . पालक प्रतिनिधी म्हणून श्री राहुल गांधी, श्री विजय गायकवाड या पालकांनी शाळेतील सर्व उपक्रमांबाबत आणि गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पालकांची वेळोवेळी मिळालेली साथ, विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि शालेय सर्वच उपक्रमांसाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत या सर्व गोष्टी एकत्र आल्या की शाळेची जोरदार प्रगती दिसून येते असे याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ ज्योती केसकर यांनी मत व्यक्त केले. आभार सौ. वैशाली सातपुते यांनी मानले.

याप्रसंगी प्रत्येक पालकाला एकेका वृक्षाचे रोप देऊन पालक सभेची सांगता झाली तसेच पर्यावरण संवर्धनाविषयी या पालक सभेमधून जाणीव जागृती निर्माण करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा देशपांडे यांनी केले. फलक लेखन अश्विनी मेंद्रे ,सीमा कवाष्टे यांनी केले. सर्व शिक्षक वृंदांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. सर्व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे