ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विश्वगुरू संत श्रीनिवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे अहिल्यानगरात भावपूर्ण स्वागत..

अहिल्यानगर

“परंपरेचा सन्मान… भक्तीचा अभिमान..अहिल्यानगर महानगरपालिकेकडून पालखी सोहळ्यास विनम्र अभिवादन..”

विश्वगुरू संत श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळा सन २०२६ अंतर्गत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र पालखी सोहळ्याचे शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर भावपूर्ण स्वागत व सन्मान करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरून मार्गक्रमण करणाऱ्या पालखीचे मनोभावे पूजन करण्यात आले. यावेळी पालखीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आले तसेच पालखी सोहळ्याचे अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी महापौर सौ. ज्योती गाडे, आयुक्त श्री. यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त श्री. नागेंद्र मुतकेकर तसेच उपायुक्त श्री. मेहेर लहारे नगरसेवक ऋग्वेद गंधे यांच्यासह अहिल्यानगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे