ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
पारिजातक समूहाच्या द्वितीय साहित्य संमेलनात ‘चौथ्या फातिमाबी शेख साहित्य संमेलनाध्यक्षा’ म्हणून मेहमुदा रसुल शेख यांचा सत्कार
पुणे

दिनांक १७ /५ /२०२६ रोजी पारिजातक समूहाच्या द्वितीय साहित्य संमेलनात ‘चौथ्या फातिमाबी शेख साहित्य संमेलनाध्यक्षा’ म्हणून माझा सत्कार गझलेचे चालते बोलते व्यासपीठ डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक दिग्गज गझलकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा.ए.के. शेख, उद्घाटक मा. डॉ. इकबाल मिन्ने सर, बाजीगर गझल समूह अध्यक्ष मा. सिराज सिकलगार सर, गजल गुरु माई बांदिवडेकर, गजल गुरु सुनंदामाई (गझलनंदा) या सर्व दिग्गज गझलकारांसमोर आपली गझल सादर करण्याची संधी पारिजातक समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. मुल्ला सर व शबाना मुल्ला मॅडम यांनी उपलब्ध करून दिली.
त्याबद्दल दोघांचे खूप खूप आभार व मनापासून धन्यवाद…




