ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

संभाजी महाराज जयंतीनिमित्त धर्मवीरांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा…

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रोफेसर चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या तलवारबाजी व विविध मैदानी खेांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांमध्ये शिवकालीन शौर्याची प्रेरणा जागवली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे, धर्म आणि राष्ट्रनिष्ठेचे तेजस्वी प्रतीक होते. त्यांचे अद्वितीय शौर्य, त्याग आणि पराक्रम आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.

अहिल्यानगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले हे भव्य स्मारक नगरकरांसाठी अभिमानाची बाब असून, इतिहास आणि स्वाभिमान जपणारे प्रेरणास्थान ठरत आहे.

यावेळी महापौर सौ. ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त मेहेर लहारे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, महापालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे