ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शबनम न्युज मीडिया तर्फे कवयित्री /गझलकार मेहमूदा रसूल शेख यांना शानदार सशक्त नारी पुरस्कार प्रदान

दिनांक १६ /५ /२०२६ रोजी  तारांगण सभागृह चिंचवड येथे शबनम न्युज मीडिया तर्फे कवयित्री /गझलकारा मेहमूदा रसूल शेख यांना ‘शानदार सशक्त नारी पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार झाशीची राणी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रूपालीताई ठोंबरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराची माहिती देताना मेहमूदा शेख यांनी सांगितले की शबनम न्यूज चॅनेलच्या शबनम मॅडम यांच्या कार्याला मनापासून सलाम !

माझ्या कार्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार जाहीर केला.. या पुरस्कारासाठी पिं. चिं. म.न.पा. मधील सामाजिक कार्यकर्त्या, बचत गट, पत्रकारिता, साहित्यिक अशा उल्लेखनीय काम करणा-या कर्तबगार महिलांच्या पाठीवर शाबासकी थाप देण्याचे काम शबनम न्यूज मीडिया करत आहे त्यांचे कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

या कार्यक्रमासाठी नगरसेविका सुलभाताई उबाळे, सामाजिक कार्यकर्ता प्रियाताई अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे, सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनालीताई हिंगे तसेच सामाजिक कार्यकर्त्या किरणताई भोईर यांची उपस्थिती लाभली होती…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे